बीड, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील अपघात ग्रस्त पुलाच्या बांधणी कामाला तसेच सर्विस रस्ता जोडणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या कामाची पाहणी केली.
बीड शहरातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बायपास रस्त्यावरील शहरात वळणावर नेहमी अपघात होत होते, त्या दोन्ही ठिकाणी पुलांची बांधणी व 12 किलोमीटर च्या रस्त्यावर स्लिप सर्व्हिस रस्ता जोडणीच्या कामाची आज सुरूवात झाली. आज कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू झालेले काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी सुचना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis