पंढरपूर आणि उत्तर सोलापूर अनुसूचित जातीसाठी राखीव
सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण आज शुक्रवारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आले. त्यामध्ये पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या दोन पंचा
पंढरपूर आणि उत्तर सोलापूर अनुसूचित जातीसाठी राखीव


सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण आज शुक्रवारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आले.

त्यामध्ये पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या दोन पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव झाले असून त्यामध्ये उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाली आहे. यामुळे उत्तर मध्ये यापूर्वी सभापती राहिलेल्या रजनी भडकुंबे यांना पुन्हा संधी मिळणार का याची उत्सुकता लागली आहे. दक्षिणचे सभापती पद सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने त्या ठिकाणाहून भाजपचे युवा नेते मनीष देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्या तीन जागेसाठी बार्शी, करमाळा, सांगोला, मोहोळ, माळशिरस, अक्कलकोट, मंगळवेढा या सात तालुक्यातून OBC साठी तीन चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यातून मोहोळ, अक्कलकोट, करमाळा ओबीसी साठी आरक्षित झाले.

यानंतर माळशिरस, माढा, सांगोला या तीन तालुक्यातून सर्वसाधारण महिलेसाठी एक चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सांगोला महिलेसाठी राखीव झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande