स्वच्छतेचे खरे शिल्पकार सफाई सेवकच : पुणे उप आयुक्त
पुणे, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यात सफाई सेवकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे असल्याने महापालिका नेहमीच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक असते. यासाठी स्वच्छता सेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वती
स्वच्छतेचे खरे शिल्पकार सफाई सेवकच : पुणे उप आयुक्त


पुणे, 11 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यात सफाई सेवकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे असल्याने महापालिका नेहमीच त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक असते. यासाठी स्वच्छता सेवकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच हेतूने आज हे सफाई सुरक्षा मित्र शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त सचिन पवार यांनी केले. डॉ. हेगडेवार क्रीडा संकुल अजमेरा कॉलनी येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयोजित‘सफाई मित्र सुरक्षा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य विभागाचे उप आयुक्त सचिन पवार बोलत होते.

या शिबिराचे प्रास्ताविक करताना महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजीराव ढगे यांनी सफाई सेवकांना नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे,डॉ. शैलजा भावसार,आरोग्य कार्यकारी अधिकारी अमित पंडित,सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते,राजेश भाट,महेश आढाव,अंकुश झिटे श्रीराम गायकवाड,मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे,उद्धव डवरी,कांचनकुमार इंदलकर,सतीश इंगेवाड,स्वच्छता ब्रँड वैभव घोळवे,स्वच्छता दूत अरविंद भोसले,तानाजी भोसले यांच्यासह अन्य महापालिका अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

या शिबिरात नवीन थेरगाव,तालेरा,आकुर्डी,सांगवी,जिजामाता,यमुनानगर,भोसरी व वायसीएम रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी सफाई सेवकांची तपासणी केली. यामध्ये रक्त तपासणी,ॲनिमिया,हिमोग्लोबिन,हृदयविकार,मधुमेह,कॅल्शियम,हायपरटेन्शन आदींची तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात आले. या शिबिरात तब्बल २ हजारांहून अधिक सफाई सेवकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande