पुणे, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळीच्या काळातच शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा होणार आहे. त्यामुळे, आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना नाही, तर शिक्षकांनाच अभ्यास करावा लागणार आहे. अंदाजे दोन हजार शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे ५२ वर्षांच्या आतील सर्व शिक्षकांना फक्त दोन वर्षांतच टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे, अशा स्थितीत किती शिक्षक ही पात्रता परीक्षा गांभीर्याने घेतात आणि उत्तीर्ण होतात ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य परीक्षा परिषदेने महाटीईटी परीक्षेची घोषणा केली आहे. सध्या टीईटी परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या तब्बल २१५ इतकी आहे. या शाळांमध्ये एकूण १० हजार शिक्षक शिकवायला आहेत. त्यातील अंदाजे २ हजार शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु