अमरावती महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत नेहरु मैदानच्‍या जागेत होणार
अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। महापालिकेत विविध कामकाजाबाबत आमदार खोडके दाम्पत्यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक.. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शहरीकरण वाढत चालली आहे. त्‍या दृष्‍टीने नागरी सुख-सुविधा उपलब्‍ध करण्‍याला घेवून शासनस्‍तरावर प
महापालिकेतील नूतन प्रशासकीय इमारत नेहरु मैदानच्‍या खुल्‍या जागेत होणार श्री अंबादेवी-एकविरादेवी विकास आराखड्याला तत्‍वता मान्‍यता..


अमरावती, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। महापालिकेत विविध कामकाजाबाबत आमदार खोडके दाम्पत्यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक.. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शहरीकरण वाढत चालली आहे. त्‍या दृष्‍टीने नागरी सुख-सुविधा उपलब्‍ध करण्‍याला घेवून शासनस्‍तरावर प्रयत्‍न होत असले तरी महापालिका प्रशासकस्‍तरावर त्‍याची प्रभावी अंमलबजावणी करणे अतिशय महत्‍वाचे आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्‍वय साधून नागरी सुविधेच्‍या कामांची तातडीने पुर्तता करावी, अश्‍या सुचना अमरावतीच्‍या आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी दिल्‍या. आज दिनांक १० ऑक्‍टोंबर,२०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यासाठी मनपाच्‍या विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्‍ये महापालिकेतील नूतन प्रशासकीय इमारत ही नेहरु मैदान येथील खुल्‍या जागेवर निर्माण करण्‍यासंदर्भात चर्चा करण्‍यात आली. तसेच श्री अंबादेवी व एकविरादेवी येथील विकास आराखड्याला तत्‍वता मान्‍यता देण्‍याबाबतही सकारात्‍मक चर्चा करण्‍यात आली. या बैठकीला महाराष्‍ट्र विधानपरिषद सदस्‍य आमदार संजय खोडके, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, यश खोडके यांच्‍यासह विभागप्रमुख उपस्थित होते. बैठकीमध्‍ये महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांतील प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि विकास योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व प्रथम मा.आमदार महोदयांचे मा. आयुक्‍त यांनी पुष्‍पगुच्‍छ देवुन स्‍वागत केले. त्‍यानंतर मा. आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी महानगरपालिकेतील सर्व विभागामार्फत राबविण्‍यात येणा-या विविध योजनेबाबत माहिती दिली. मा. आमदार महोदयांनी प्रत्‍येक विभागात चालणारे कामाचे कार्यपध्‍दती बाबत माहिती घेवुन काही विषयावर उपस्थित नागरीकांसह संबंधीत अधिकारी यांचे सोबत चर्चा करुन नागरीकांच्‍या समस्‍यांचे निराकरण करणेबाबत सुचना दिल्‍यात. आमदार महोदयांनी आज विषेशतः बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, नगर रचना विभाग, टॅक्‍स विभाग, अतिक्रमण विभाग, उद्यान विभाग, प्रकाश विभाग, पशुवैद्यकीय विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना तसेच शिवटेकडी (मालटेकडी) व वडाळी तलाव-उद्यान, शहरातील साफ सफाई व कचरा उचलणेबाबत तसेच आरोग्‍य विभागाशी संबंधीत कामाबाबत नागरीकांच्‍या समस्‍यावर चर्चा करुन संबंधीतांना निर्देश देण्‍यात आले. अमरावती महानगरपालिकेची प्रशस्‍त नूतन इमारत बांधकामाचे काम अंतिम टप्‍प्‍यात प्रस्‍तावित आहे. याबाबतचा तज्ञ आर्किटेक्‍ट कडून आराखडा व स्ट्रक्चर डिझाईन लवकर सादर करावे, असे निर्देश देण्यात आले. तसेच महापालिकेतील नूतन प्रशासकीय इमारत ही नेहरु मैदान येथील खुल्‍या जागेवर उभारण्‍यासंदर्भातही बैठकीत खल देण्‍यात आला. या संदर्भात जिल्‍हाधिका-याकडे प्रस्‍ताव सादर करण्‍यासंदर्भातही बैठकीतून चर्चा करण्‍यात आली. मनपा आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी सांगीतले की, या संदर्भात महाराष्‍ट्र राज्‍य इन्‍फ्रन्‍सस्ट्रक्चर डेव्‍हलपमेंट कॉरपोरेशन द्वारे याबाबतचे प्रारुप तयार करण्‍याबाबत सांगीतले तसेच श्री. अंबादेवी-एकविरा देवी मंदिराला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळविण्यासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाबाबतही आयुक्‍तांनी माहिती दिली. यावर दोन्‍ही संस्‍थांनसोबत मनपा प्रशासनाने समन्‍वय साधून श्री अंबादेवी व एकविरादेवी संस्‍थांन येथील विकास आराखड्याला बैठकीत तत्‍वता मान्‍यता देवून पुढील नियोजन करण्‍याबाबत आमदार खोडकेंनी सुचना केल्‍यात.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande