आढावा बैठकीत प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।
धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार तातडीची मदत दिली जाणार आहे.आढावा बैठकीत प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात शेती, रस्ते, पूल आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी आणि मदतकार्याला वेग देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही प्रशासनाने दिली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
पायाभूत सुविधांची दुरुस्ती: अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेले रस्ते, पूल आणि बंधारे यांची तात्काळ दुरुस्ती सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
अखंड वीजपुरवठा: शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी अखंड वीजपुरवठा मिळावा, यासाठी सर्व ११ के.व्ही. विद्युत वाहिन्या आणि उपकेंद्रांची दुरुस्तीची कामे येत्या २० दिवसांत पूर्ण करावीत. तसेच, फिडर सेपरेशनची प्रलंबित कामे जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.
नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे वास्तववादी पद्धतीने करून शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेवर भरपाई मिळेल याची खात्री करावी.
घर आणि पशुधन नुकसान भरपाई: पुरामुळे ज्यांची घरे आणि पशुधन वाहून गेले आहे, त्यांचेही पंचनामे करून त्यांना तातडीने मदत वितरित केली जावी.
गाळ काढण्यासाठी विशेष मदत: ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीत गाळ साचला आहे, त्यांना रोजगार हमी योजनेतून (रोहयो) गाळ काढण्यासाठी ३० हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis