उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले - अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। शिवसेनेचे छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरे यांच्यावर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनीच तुम्हाला घडवलं अशा शब्द
अ


छत्रपती संभाजीनगर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।

शिवसेनेचे छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरे यांच्यावर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनीच तुम्हाला घडवलं अशा शब्दात दानवे यांनी भुमरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना संदीपान भुमरे यांनी हे ध्यानी घ्यावं की..ध्यानीमनी नसताना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देणारे उद्धव ठाकरे हेच होते. कोविडचे बलशाली संकट राज्यावर असताना उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्या रोजगार हमी खात्याचा रुपयाही निधी कपात करण्यात आला नव्हता.

२०१९ पर्यंत आपण जो निवडणूक उमेदवारी अर्ज भरून आमदार झालात, त्या फॉर्मवर उद्धव ठाकरेचीच सही होती. आपले सुपुत्र जिल्हापरिषद सदस्य, सभापती झाले ते उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाकडून झाले होते. आपला स्लीपबॉय ते मद्यविक्रीसम्राट हा प्रवास सर्वश्रुत आहे. कशाला अधिक बोलायला लावता? दानत आणि हिम्मत असेल तर सरकारला कर्जमुक्ती देण्यासाठी आपण भाग पाडाल! जे तुमच्या आवाक्याबाहेर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande