लातूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे व्हील चेअर वाटप कार्यक्रम संपन्न झाला लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची यावेळी उपस्थिती होती.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,लातूर येथे LYC फाउंडेशन च्या वतीने शासकीय महाविद्यालयाला हजार काळगे यांच्या हस्ते व्हील चेअर भेट देण्यात आली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी येतात,त्यांच्या सोईसाठी या व्हील चेअर उपयोगात येणार आहेत.
याप्रसंगी महाविद्यालयाचे डीन डॉ उदय मोहिते,सर्व विभाग प्रमुख,फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis