सोलापूर, 11 ऑक्टोबर (हिं.स.)।ज्यांचे खरोखरच नुकसान झाले आहे, त्या मधील कोणीही नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन प्राधान्य क्रमाने काम करत आहे. बाधितांचे सरसकट पंचनामे सुरू झाले आहेत.सर्वसामान्य शेतकऱ्यांची जाण असल्यानेच या सरकारे शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारे पॅकेज जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केले.सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मंत्री भरत भोगावले यांनी अचानक मोहोळ तहसील कार्यालयाला भेट देऊन तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडून मोहोळ तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.यावेळी मंत्री गोगावले यांनी कोणत्याही गावात राजकीय हेतूने काम होऊ नये अशा सुचना प्रशासनाला दिल्या. मोहोळच्या तहसीलदारांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व बाधित नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून त्या नागरिकांना व शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड