छत्रपती संभाजीनगर, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। बेलगाव (पिंपळगाव) ता. भूम येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मीठ, धान्य, व इतर आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरण करण्यात आले.
यावेळी खासदार ओम राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील,जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, तालुका प्रमुख अनिल दादा शेंडगे,उपजिल्हा प्रमुख चेतन बोराडे तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते
हा उपक्रम महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, स्थानिक लोकाधिकार समिती, आणि जाणीव ट्रस्ट यांच्या सहकार्याने यशस्वी झाला. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis