बीड जिल्ह्यातील आठ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव
बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या महिलेला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठ जिल्हा परिषद सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. विशेष म्हणजे एस सी साठी राखीव असलेल्या केज मतदार संघातून
बीड जिल्ह्यातील आठ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव


बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या महिलेला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आठ जिल्हा परिषद सर्कल अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहेत. विशेष म्हणजे एस सी साठी राखीव असलेल्या केज मतदार संघातून एकच जागा राखीव झाली आहे तर परळी मतदार संघातून तीन जागा एस सी साठी राखीव झाल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी याबाबत यादी जाहीर केली आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी राखीव जिल्हा परिषद गटाची घोषणा करण्यात आली. यामध्ये माजलगाव मतदार संघातील तालखेड आणि केसापुरी तर धारूर तालुक्यातून तेलगाव, केज मतदार संघातून होळ आणि परळी मतदार संघातून पिंप्री बुद्रुक,मोहा आणि जिरेवाडी या तीन जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande