परभणी - एचएआरसीतर्फे अनाथ बालकांना दिवाळी किटचे वाटप
परभणी, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे दिवाळी दान महोत्सवाच्या निमित्ताने सेलू येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 54 अनाथ व निराधार मुला-मुलींना दिवाळी किट, तसेच 7 एकल पालक मुलींना नवीन
परभणी - एचएआरसीतर्फे अनाथ बालकांना दिवाळी किटचे वाटप


परभणी, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेतर्फे दिवाळी दान महोत्सवाच्या निमित्ताने सेलू येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 54 अनाथ व निराधार मुला-मुलींना दिवाळी किट, तसेच 7 एकल पालक मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले.

एचएआसी संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी दान महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे यंदाचे पंधरावे वर्ष असून, समाजातील गरजूंना आनंदाने दिवाळी साजरी करता यावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येतो. या संस्थेच्या वतीने सेलू येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील 54 अनाथ व निराधार मुला-मुलींना दिवाळी किट, तसेच 7 एकल पालक मुलींना नवीन ड्रेसचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, रवी मंत्री, अ‍ॅड. चंद्रकांत राजुरे, सुनिता वेडे, शरद ठाकर, रामराव बोबडे, रामराव गायकवाड व लक्ष्मण गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या रायपूर, राणी वाहेगाव (परतूर), खैरी, पार्डी, केमापूर, कान्हड, भांगापूर, देवळगाव गात, मापा, बोरगाव, पिंपरी, पिंपळगाव गोसावी, मालेटाकळी, कुंडी, हदगाव, गिरगाव, गव्हा या शाळांमधील 54 एकल पालक व अनाथ मुलांची निवड करण्यात आली होती.वाटप करण्यात आलेल्या दिवाळी किटमध्ये साडी, फराळाचे पदार्थ (फरसाण, शंकरपाळे, बाकरवडी, चकली, बालुशाही), तसेच मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, टूथपेस्ट, ब्रश, कंगवा, ब्लँकेट, चिक्की, राजगिरा लाडू, पॉड्स पावडर, शॅम्पू आदी वस्तूंचा समावेश होता, अशी माहिती डॉ. पवन चांडक यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande