बीड जिल्ह्यात शाळांना 16 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर सुट्टी
बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। शालेय शिक्षण विभागाने दिपावलीच्या सुट्ट्यांची अधिसूचना प्रसिध्द केली असून या शैक्षणिक वर्षे 2025-26 मध्ये दिपावलीसाठी 16 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र 2 नोव्हेंबरला रवि
बीड जिल्ह्यात शाळांना 16 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर सुट्टी


बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

शालेय शिक्षण विभागाने दिपावलीच्या सुट्ट्यांची अधिसूचना प्रसिध्द केली असून या शैक्षणिक वर्षे 2025-26 मध्ये दिपावलीसाठी 16 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात सुट्ट्या मिळणार आहेत.

मात्र 2 नोव्हेंबरला रविवार आल्यामुळे 3 नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होतील. या वर्षी 21 दिवसांऐवजी 17 ते 18 दिवसच दिपावलीच्या शैक्षणिक सुट्ट्या मिळणार आहेत.

प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी या दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या पत्रकाने या सुट्ट्यांच्या सूचना प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये 16 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर असा या सुट्ट्यांचा कालावधी आहे. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये किमान 238 कार्यदिवस असले पाहिजेत.उन्हाळी आणि दिवाळी अशा मिळून एकूण 75 दिवस सुट्ट्या असावेत असे ही या पत्रकात म्हंटलेले आहे. त्यामुळे सहाजिकच 15 ऑक्टोंबरपर्यंत इयत्ता 1 ते 12 वी पर्यंत प्रथम सत्र परिक्षा पार पडणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande