अकोला आरोग्य विभागातर्फे ‘सीपीआर’ जनजागृती आठवडा
अकोला, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन’ अर्थात सीपीआर ही आपत्कालीन जीवनरक्षक प्रक्रिया आहे, व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबल्यावर सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले जातात. या प्रक्रियेबाबत जनजागृतीसाठी आरोग्य विभागामार्फत ‘सीपीआर जनजाग
अकोला आरोग्य विभागातर्फे ‘सीपीआर’ जनजागृती आठवडा


अकोला, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। ‘कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन’ अर्थात सीपीआर ही आपत्कालीन जीवनरक्षक प्रक्रिया आहे, व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबल्यावर सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले जातात. या प्रक्रियेबाबत जनजागृतीसाठी आरोग्य विभागामार्फत ‘सीपीआर जनजागृती आठवडा’ साजरा केला जात आहे.

जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, आरोग्य उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी नियोजन करून उपक्रमांची आखणी केली आहे.

धावपळीचे जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे हदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सीपीआरबाबत जनजागृती करून याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे. श्वासोच्छवास किंवा हृदयाचे ठोके थांबल्यावर छातीवर दाब देणे आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन व्यक्तीला पूर्ववत करण्याचा प्रयत्न होतो. यात तिचे प्राण वाचतात. श्वास किंवा हृदयाचे ठोके थांबल्यावर मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवठा सुरू ठेवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

सीपीआर दिल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानंतर जगण्याची शक्यता दुप्पट किंवा तिप्पट होऊ शकते. आपत्कालीन परिस्थितीत असलेल्या व्यक्तीच्या छातीवर जलद आणि जोरदार दाब दिले जातात आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जातो.

सीपीआर देण्याचे टप्पे!

आपत्कालीन सेवांना (उदा. १०८ किंवा ११२) लगेच कॉल करावा. व्यक्तीला सपाट पृष्ठभागावर पाठीवर झोपवा.आजूबाजूची परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री करा, रुग्णाला धक्का देऊन किंवा आवाज देऊन तो शुद्धीत आहे का ते तपासा. तो श्वासोच्छ्वास करत नसेल तर त्याला सीपीआर द्या,

छातीच्या मध्यभागी हाताचा तळवा ठेवा आणि दुसरा हात त्याच्यावर ठेवा.तुमचे हात सरळ ठेवा आणि छातीवर प्रौढांच्या सीपीआरसाठी, छाती अंदाजे ५ सेमी (२ इंच) खोल दाबावी. हे दाबाचे ५ ते ३० वेळा पुनरावृत्ती करा, कृत्रिम श्वास द्यावा. ३० वेळा छातीवर दाब दिल्यानंतर, रुग्णाच्या तोंडावाटे कृत्रिम श्वास द्या, पुन्हा करा: हे दाब देणे आणि श्वास देण्याचे चक्र सुरू ठेवा जोपर्यंत वैद्यकीय मदत येत नाही किंवा रुग्ण शुद्धीवर येत नाही. सीपीआर सप्ताहानिमित्ताने जनतेने या प्रक्रियेबाबत माहिती जाणून घ्यावी. आपण आपत्कालीन परिस्थीतीत एखाद्याचे प्राण वाचवू शकतो. म्हणून सीपीआर तंत्राचा अंगीकार करावा, असे आवाहन डॉ. गाढवे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande