पदवीधर पात्र व्यक्तींनी 6 नोव्हेंबरपूर्वी अर्ज सादर करावा!
अकोला, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यात येत असून, नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येकाने दि. 6 नोव्हेंबरपर्यंत नमुना 19 मध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार
पदवीधर पात्र व्यक्तींनी 6 नोव्हेंबरपूर्वी अर्ज सादर करावा!


अकोला, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्यात येत असून, नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येकाने दि. 6 नोव्हेंबरपर्यंत नमुना 19 मध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.

याबाबतचे परिशिष्ट ब-१ जिल्हाधिकारी कार्यालय, जि. प. कार्यालय, महापालिका, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सर्व पंचायत समित्या व नगरपरिषदांच्या स्तरावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदारयाद्या 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकानुसार निश्चित करण्यात येत आहेत.

मतदार नोंदणीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने दि. 6 नोव्हेंबरपर्यंत नमुना 19 मध्ये आपला अर्ज सादर करावा. यासाठी मतदार नोंदणी नियम, 1960 च्या नियम 31 (4) नुसार प्रसिद्ध केलेल्या नोटीसची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात आली आहे. यासंबंधीचा सर्व तपशील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या आणि विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande