अकोल्यात ओव्हरब्रिजसाठी नागरिकांचा अनोखा लढा !
अकोला, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।न्यु तापडिया नगर – पंचशील नगर परिसरातील नागरिकांनी आज एक आगळंवेगळं पण प्रभावी आंदोलन उभारलं आहे. ‘रेल्वे ओव्हरब्रिजसाठी प्रलंबित ₹५४ कोटी निधी तात्काळ मंजूर करावा’ या मागणीसाठी नागरिकांनी १००० आंतरदेशीय पत्रे थेट राज्याचे
P


अकोला, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।न्यु तापडिया नगर – पंचशील नगर परिसरातील नागरिकांनी आज एक आगळंवेगळं पण प्रभावी आंदोलन उभारलं आहे. ‘रेल्वे ओव्हरब्रिजसाठी प्रलंबित ₹५४ कोटी निधी तात्काळ मंजूर करावा’ या मागणीसाठी नागरिकांनी १००० आंतरदेशीय पत्रे थेट राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना पाठविली.

त्यावेळी शहर अध्यक्ष मनोहर बनसोड, साजन ( राजु) भाऊ अपगड, डॉ.मुकुंदराव सातपुते,संदिपभाऊ शेरेकर, मुकुंदराव देशपांडे, नरेंद्र परदेशी,विनोद भाबेरे,,मोहन कनोजिया, अविनाश भागवत, भास्करराव बैतवार,नाजुक राव पावसाडे शैलश देव यांच्या सह अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आंदोलन सहभाग घेतला हे आंदोलन ‘पहिला टप्पा’ म्हणून निलेश देव यांच्या नेतृत्वाखाली शांत, शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात आले. अकोल्यातील गेट क्रमांक ३८, न्यु तापडिया नगर येथे उभारला जाणारा रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) हा शहरातील अत्यावश्यक प्रकल्प आहे. या पुलामुळे पंचशील नगर,डुबे वाडी, चैतन्य नगर, जठार पेठ आणि रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूंतील नागरिकांना कायमस्वरूपी वाहतुकीचा दिलासा मिळणार आहे. राज्य शासन, मध्य रेल्वे व स्थानिक जनप्रतिनिधी यांच्या सहकार्याने या पुलाचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालेले आहे. मात्र, उर्वरित ₹५४ कोटी निधी वित्त विभागाकडे प्रलंबित असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काम ठप्प आहे. अनेकदा शासनस्तरावर पत्रव्यवहार झाला आहे! निधीअभावी नागरिकांची दररोजची जीवघेणी परिस्थिती पावसाळ्यात हा परिसर चिखल व पाण्याच्या डबक्यांनी भरतो. विद्यमान रस्ता कोसळून दरवर्षी वाहतुकीचा खोळंबा होतो. ३-४ फूट पाणी साचल्याने वाहनचालक, शालेय विद्यार्थी, कामगार यांना त्रास होतो. रुग्णवाहिकांना ६-७ कि.मी. लांब फेरी मारावी लागते. मृत व्यक्तींच्या अंत्ययात्रांनाही वळसा घ्यावा लागतो. या परिस्थितीमुळे नागरिकांत तीव्र असंतोष असून “आता पुरे!” या भावनेतूनच १००० आंतरदेशीय पत्रांचे आंदोलन उभे राहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande