अंबाजोगाई : मायक्रो ओबीसी, बलुतेदार अलुतेदार चिंतन परिषद संपन्न
बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मागदर्शनाखाली मायक्रो ओबीसी, बलुतेदार अलुतेदार चिंतन परिषद अंबाजोगाई, बीड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यात आ.संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली सकल
अ


बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। भाजपा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मागदर्शनाखाली मायक्रो ओबीसी, बलुतेदार अलुतेदार चिंतन परिषद अंबाजोगाई, बीड येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

राज्यात आ.संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली सकल मायक्रो ओबीसी, अलुतेदार - बलुतेदार समाजाची विविध मागण्या व रोहिणी आयोग लागू करावा या मागणीसाठी राज्यभरात समाज जागृतीचे मोहीम राबवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह संत गाडगेबाबा यांचे वंशज प्रविणराव जाणोरकर, साहितरत्न अण्णाभाऊ साठे याचे वंशज श्री. सचिन साठे साहेब हे होते. यावेळी आयोजक भीमराव दले, शशिकांत आमने, प्रशांत डोरले, कलीम जहांगीर, भूमन्ना अक्क्केवाड, बालाजी शिंगे, जानकीराम पांडे , श्री.संजय जोरले , श्री.अरुण भालेकर, यांच्यासह विविध मायक्रो ओबीसी समाजाचे नेते व प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande