रत्नागिरी, 14 ऑक्टोबर, (हिं. स.) : भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे तसेच सौ. कामना बेग यांच्यातर्फे रत्नागिरीत पोलीस सेवेतील महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वस्थ नारी सशक्त परिवार...! या अर्थपूर्ण घोषवाक्याखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे रत्नागिरी पोलीस मुख्यालयात पोलीस सेवेत कार्यरत महिलांसाठी हे विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिर झाले. या शिबिरामध्ये महिलांसाठी दातांची तपासणी, गर्भाशय तपासणी, तसेच कर्करोग मार्गदर्शन अशा विविध मोफत तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमास पोलीस सेवेतील अनेक महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी या उपयुक्त शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक फडके यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस अधीक्षक बगाटे यांनी शिबिराला भेट दिली.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे, सरचिटणीस नूपुरा मुळ्ये,शहर अध्यक्षा भक्ती मनोर दळी, ओबीसी शहर अध्यक्षा सोनाली केसरकर सौ. कामना बेग, शहर खजिनदार शोनाली आंबेरकर, सुचिता नाचणकर, महिला तालुकाध्यक्ष अनुश्री आपटे, प्रणाली रायकर, प्रज्ञा टाकळे, अनुष्का शेलार, सिया घाग, राधिका आपटे यावेळी उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांकडून भाजपा महिला मोर्चा कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. पोलीस अधीक्षक बगाटे तसेच उपअधीक्षक फडके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी