बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।गेवराई तालुक्यातील मनसे प्रमुख पदाधिकारी श्री. राजेंद्र मोटे यांनी आज शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातील खासदार बजरंग सोनवणे आमदार क्षीरसागर आणि जिल्हाध्यक्ष मस्के उपस्थित होते.
प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) चे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था,निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंतराव पाटील साहेब, माजी मंत्री राजेश (भैय्या) टोपे, आमदार रोहित दादा पवार खासदार बजरंग बप्पा सोनवणे, आमदार संदीप भैय्या क्षीरसागर तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी व पक्षाची रणनीती यावर सखोल चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) अधिक मजबूत करण्यासाठी आणि बीड जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे राजेंद्र मस्के
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ), बीड यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis