पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।
: युनेस्को (UNESCO) च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ दुर्गांना मानवंदना देण्यासाठी “अमृत दुर्गोत्सव २०२५” हा उपक्रम लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
युनेस्कोने घोषित केलेल्या १२ दुर्गांपैकी कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती तयार करून, त्या प्रतिकृतीसोबतचा सेल्फी https://www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. या लोकोत्सवाद्वारे शिवछत्रपतींच्या दुर्गांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेतून विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात येणार आहे.
या सर्व छायाचित्रांचे संकलन करून “अमृत” (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) विश्वविक्रम नोंदणीसाठी सादर करणार आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना मा. मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीसह अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे.असे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
000000
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु