शारदा महाविद्यालयाचे डॉ. काझी कलीमोद्द्दीन यांना उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार
परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।येथील शारदा महाविद्यालयातील उर्दू विभाग प्रमुख डॉ. काझी कलीमोद्द्दीन यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे दरवर्षी उत्कृष्ट शि
शारदा महाविद्यालयाचे डॉ. काझी कलीमोद्द्दीन यांना उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार


परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।येथील शारदा महाविद्यालयातील उर्दू विभाग प्रमुख डॉ. काझी कलीमोद्द्दीन यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे दरवर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी डॉ. काझी कलीमोद्द्दीन यांची निवड करण्यात आली. डॉ. काझी मागील सत्तावीस वर्षांपासून शारदा महाविद्यालयात उर्दू विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते उत्कृष्ट गझल गायक असून आजपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सर्वच बाबतीत मदत केली आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग नोंदवून पेपर सादर केले असून त्यांची उर्दू साहित्यावरील अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यासोबतच अनेक वर्षापासून स्वामी रामानंद तीर्थमराठवाडा विद्यापीठाच्या उर्दू अभ्यास मंडळावर सन्माननीय सदस्य म्हणून कार्यरत असून विद्यापीठातील अनेक समित्यांवर सदस्य म्हणून कार्य केले आहे. परभणी शहरातील त्रैभाषिक कवी संमेलन, मुशायरा यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. या सर्व कार्याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाच्या उर्दू साहित्य अकादमीने त्यांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार डॉ . काजी यांना अल्पसंख्याक विभागाच्या आयुक्त सौ. प्रतिभा इंगळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन पवार, उपप्राचार्य डॉ. शामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे, कार्यालय प्रमुख सुरेश जयपूरकर व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande