पुरग्रस्त शेतक-यांना औषध-बियाणे कंपनीकडून रब्बी साठी हरभरा बियाणे भेट
परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।ऑगष्ट-सप्टेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीपातील पिके पार उध्वस्त झाली ..त्यातही गोदावरी नदीला आलेल्या महापुरात काठावरील शेतक-यांच्या शेतात होत्याचं नव्हतं झालं तर गावागावातील नद्या, ओढे ,नाले मर्यादा सोडून वाहिल्याने
पुरग्रस्त शेतक-यांना औषध-बियाणे कंपनीकडून  रब्बी साठी हरभरा बियाणे भेट ; दिपावलीसाठी कपडे आणि फराळ


परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।ऑगष्ट-सप्टेबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीपातील पिके पार उध्वस्त झाली ..त्यातही गोदावरी नदीला आलेल्या महापुरात काठावरील शेतक-यांच्या शेतात होत्याचं नव्हतं झालं तर गावागावातील नद्या, ओढे ,नाले मर्यादा सोडून वाहिल्याने शेतातील पिकांसह माती ही खरडून गेल्याने अनेक शेतक-यांचं कधीही न भरुन येणारं नुकसान या वर्षी झाल्याचं पहायला मिळत आहे. शेतक-यांवर ओढवलेल्या या संकट काळात अनेकांचे मदतीचे हात पुढे येत असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील बुस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स प्रा. लि. ही औषध आणि बियाणे निर्मिती कंपनी शेतकरी मदती साठी पुढे सरसावली धनलक्ष्मी कृषी केंद्रावर तालुक्यातील आपदग्रस्त शेतक-यांना रब्बी पेरणी साठी तीस किलो हरबरा बियाणे बॅग,एन पी के बुस्ट, ट्रायकोडर्मा ही औषधी तसेच शेतकरी दाम्पत्याला दिपावली साठी साडी,चोळी आणि ड्रेस सह मिठाई आणि फराळ भेट म्हणून देण्यात आला.

या वेळी पंचायत समिती चे तालुका कृषी अधिकारी सुधाकर फुलपगार, व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष राजीव पामे, परभणी जिल्हा असोशिएशनचे संचालक तथा धनलक्ष्मी कृषीसेवा केंद्राचे संचालक संजय पामे, पत्रकार धनंजय देशपांडे, जन्मभुमी फाऊंडेशनचे सचिव तथा पत्रकार किरण घुंबरे पाटील यांच्या हस्ते या मदतीचे वाटप आपदग्रस्त शेत-यांना करण्यात आले. या वेळी कंपनीचे प्रतिनिधी कुणाल साबळे, वैभव सांगळे यांची उपस्थिती होती.

या वेळी डाकुपिंप्री येथील गणेश महात्मे,नवनाथ सोनवने,सोमनाथ सोनवने, अर्जुन सोनवने, महादेव सोनवने तारुगव्हाण येथील दामोधर पौळ, विठ्ठल पौळ कान्सुर येथील ऋषिकेश शिंदे, महेश शिंदे, बाभळगाव येथील गणेश गिराम,सचिन रणेर, सुरेश रणेर, बळीराम आव्हाड हादगाव येथील आशोक नखाते, विनायक नखाते, समी पिंपळगावचे काशिनाथ मोरे, बांदरवाड्याचे रंगनाथ गायकवाड लिंबा येथील करीम सय्यद ,भगवानराव मुळे आदि शेतक-यांना ही बियाणे मदत आणि दिपावली गोड फराळा सह शेतकरी दाम्पत्याला साडीचोळी आणि कपडे आहेर भेट देऊन उपस्थित मान्यवरांनी दिपावलीच्या आणि रब्बी पेरणी साठी शुभेच्छा दिल्या.

बुस्टर कंपनीने शेतक-यां प्रती संवेदना दाखवत मदतीचा हात दिल्या बद्दल या कंपनीच्या या कार्याचे कौतुक सर्वत्र होत असताना इतर बियाणे आणि औषध ,खत निर्मिती करणा-या कंपण्यांनी पुढाकार घेऊन संकाटातील शेतक-यांना मदतीचा हात दिला पाहिजे अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande