छत्रपती संभाजीनगर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ज्येष्ठ नेते गोरखनाथ पाटील बोडके यांची पक्षाच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर लासुर स्टेशनच्या शहराध्यक्षपदी किशोर बाबुराव पवारसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी माळीवाडगाव येथील युवा कार्यकर्ते प्रसाद पाटील देवकर यांनीही राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि तालुकाध्यक्ष सूर्यकांत पाटील गरड यांनी त्यांच स्वागत केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis