जालना : 15 ऑक्टोबरला पोलीस पाटील पदासाठी मुलाखतीचे आयोजन
जालना, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर उपविभागातील एकूण १८५ पोलीस पाटील पदांसाठी लेखी परीक्षा दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाली. लेखी परीक्षेचा निकाल दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ jalnapp.recru
जालना : 15 ऑक्टोबरला पोलीस पाटील पदासाठी मुलाखतीचे आयोजन


जालना, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर उपविभागातील एकूण १८५ पोलीस पाटील पदांसाठी लेखी परीक्षा दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाली. लेखी परीक्षेचा निकाल दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ jalnapp.recruitonline.in वर प्रसिध्दे करण्यापत आलेला आहे. तरी लेखी परीक्षेत उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. १५ ऑक्टोबर २०२५ सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहेत.

मुलाखतीचे सविस्तर वेळापत्रक आणि वेळ अधिकृत संकेतस्थळ recruitonline.in वर प्रसिद्ध करण्यातत आलेले आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या दोन स्व्यंसाक्षांकित प्रती तसेच नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट आकाराचे फोटोसोबत घेऊन सकाळी ७.३० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना येथे मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande