जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय कर्मचारी पंदाची भरती
जळगाव, 14 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या माजी सैनिक मुलांचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने स्वंयपाकी महिला-०३ व माजी सैनिक बहुउद्येशि सभागृह, जळगाव येथे सफाई कर
जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय कर्मचारी पंदाची भरती


जळगाव, 14 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या माजी सैनिक मुलांचे वसतिगृह येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने स्वंयपाकी महिला-०३ व माजी सैनिक बहुउद्येशि सभागृह, जळगाव येथे सफाई कर्मचारी पुरुष-०१ ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झालेस नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह २२ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande