गडचिरोली : वडसा येथे १५ ऑक्टोबरला रोजगार मेळावा
गडचिरोली., 14 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय औद्योगिक
गडचिरोली : वडसा येथे १५ ऑक्टोबरला रोजगार मेळावा


गडचिरोली., 14 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वडसा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात क्वेस कॉर्प, नागपूर ही नामांकित कंपनी सहभागी होणार असून, विविध तांत्रिक व औद्योगिक क्षेत्रांतील पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील तरुण-तरुणींना औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आधारकार्ड तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह स्वतःच्या खर्चाने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्यात पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया प्रत्यक्ष स्थळी पार पडणार असून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण व नोकरीच्या संधी देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील युवकांना कौशल्याधारित रोजगार उपलब्ध करून देणे आणि उद्योग क्षेत्राशी जोडणी वाढविणे हा आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी सर्व पात्र उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande