सोलापूर - कुक्कुटपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न
सोलापूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सघन कुक्कुट विकास गट,सोलापूर येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण तुकडी क्र. ३ चा प्रमाणपत्र वितरण समारंभ जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (प्रभारी) डॉ. व्हि. डी. येवले यांच्य
सोलापूर - कुक्कुटपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न


सोलापूर, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सघन कुक्कुट विकास गट,सोलापूर येथे कुक्कुटपालन प्रशिक्षण तुकडी क्र. ३ चा प्रमाणपत्र वितरण समारंभ जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय (प्रभारी) डॉ. व्हि. डी. येवले यांच्या हस्ते संपन्न झाला. जागतिक अंडी दिनानिमित्त प्रशिक्षणार्थींना उकडलेली अंडी वाटप करून अंड्याच्या पोषणमूल्यांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात डॉ. स्नेहंका बोधनकर,पशुधन विकास अधिकारी गट-अ यांनी प्रशिक्षणाची यशोगाथा विषद करत अंड्याच्या दैनंदिन आहारातील महत्त्वावर प्रकाश टाकला. शालेय विद्यार्थी व नागरीकांनी अंड्याचा आहारात समावेश करून आरोग्यरक्षण करावे,असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने यांनी केले.

प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना डॉ. येवले यांनी कुक्कुटपालन व्यवसाय हा नगदी उत्पन्न देणारा शेतीपूरक जोडधंदा असल्याचे सांगून,प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कृतीत करून प्राणीजन्य पदार्थांच्या उत्पादनातील तुट भरून काढण्याची संधी असल्याचे नमूद केले.

प्रशिक्षणार्थी श्री. सूर्यभान सावंत यांनी प्रशिक्षणामुळे स्वयंरोजगार व लघुउद्योग उभारणीस पूरक माहिती मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. प्रशिक्षण तुकडी दि. ६ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपन्न झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. जमादार,श्री. संताजी देशमुख व श्री. प्रशांत निकंबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

पुढील तुकडीसाठी जिल्ह्यातील पशुपालक व सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नोंदणी करून लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ. स्नेहंका बोधनकर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande