नाशिक, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) - नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे योग्य पद्धतीने भरले जात नसल्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी विसे चौक परिसरातील खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली.
पाहणीदरम्यान आमदार फरांदे यांच्या लक्षात आले की, सदर काम अंदाजपत्रकाप्रमाणे आणि तांत्रिक निकषांनुसार सुरू नाही. याबाबत उपस्थित उपअभियंता बोरसे यांना त्यांनी विचारले असता, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, नाशिक महापालिकेच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना बोलावण्यात आले. आमदार फरांदे यांनी सील कोटसारखा महत्त्वाचा घटक अंदाजपत्रकात समाविष्ट न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रस्त्याचे खड्डेड् भरण्याचे काम पारदर्शक, दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होऊ नये, असे सांगून त्यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र देण्याचे स्पष्ट केले. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता पाटील यांना दिले. यावेळी स्वाती भामरे, भाजपा नाशिक मध्य विधानसभाप्रमुख अनिल भालेराव, राजू भामरे, अजिंक्य फरांदे, प्रवीण मराठे, अक्षय गांगुर्डे, गोपी राजपूत व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV