बीड, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघात कापुस पिकाचा बागायती पिकांमध्ये समावेश करून त्यानुसार नुकसान भरपाई अदा करावी अशी मागणी माजलगाव चे आमदार प्रकाश सोळुंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभुतपुर्व अतिवृष्टी व महापुर परिस्थितीमुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हातोंडाशी आलेला घास हिरावुन गेला आहे.माजलगाव विधानसभा मतदार संघात सुमारे 1 लक्ष 40 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. महसुल विभागाच्या वर्गवारी नुसार शासकीय अभिलेख्यात ज्या शेत जमिनीची वर्गवारी बागायती क्षेत्र म्हणुन केली आहे, त्या क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली दिसुन येते.त्यामुळे कापुस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतांना त्यांची वर्गवारी जिरायती क्षेत्र अशी करणे हा त्यांच्यावर अन्याय होणार आहे.त्यामुळे कापुस शेतीचा बागायती वर्गवारीमध्ये समावेश करून कापुस उत्पादक शेतकऱ्यांना बागायती शेतीसाठी दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे निर्देश संबंधित विभागाला व्हावेत,अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भेटून पत्र देऊन केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis