बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.) बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्नांच्या संदर्भात जिल्ह्यातील आमदार सुरेश धस आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळुंके यांनी विविध प्रश्न संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष भेट घेतली आहे.
आज मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बागायती शेतीसाठी दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम द्यावी अशी मागणी केली. अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकर्यांना शासनाने ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्या बद्दल मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात एक निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे,
गेवराई विधानसभा मतदार संघासह संपूर्ण मराठवाडा विशेषतः बीड जिल्ह्यात खरीप हंगामात कापुस पिकाचे सार्वाधिक क्षेत्र आहे. विहीर, पाटपाणी, ठिबक सिंचन आदीच्या माध्यमातुन कापुस पिकाला शेतकरी पाणी देतो, खत, बी - बियाणे, किटकनाशके आदींवर मोठा खर्च होतो. अलीकडच्या काळात कापुस उत्पादक शेतकरी फडतरीसह पाणी देवुन सुमारे आठ महिण्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी हे पिक घेतो. एकावर्षी एकच कपाशीचे पिक त्यामुळे घेता येते. एकंदरीत बागायती वर्गवारी मधील सर्व निकष कापुस पिकाला लागु होतात.
महसुल विभागाच्या शासकीय दस्तावरील नोंदी नुसार ज्या शेत जमिनीची वर्गवारी बागायती क्षेत्र म्हणुन केली जात आहे, त्या बहुतांश जमिनीमध्ये कपाशीचे पिक घेतले जाते. त्यामुळे कापुस हे बागायती क्षेत्रावर घेतले जाणारे पिक असल्यामुळे अतिवृष्टीची नुकसान भरपाई देतांना कापुस उत्पादक शेतकर्यांना जिरायती क्षेत्राच्या वर्गवारीची नुकसान भरपाई देणे अन्यायकारक होणार आहे. असे निवेदनात म्हटले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis