बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक प्रश्नाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज भेट घेतली. बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक प्रश्नाच्या संदर्भात आपल्या अडचणी सांगितल्यानंतर शरद पवार यांनी रेल्वे मंत्र्यांना लेखी पत्र ही लिहिली आहे बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक प्रश्न तातडीने सोडवावेत असे त्यांनी लिहिले आहे अशी माहिती संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे
बीड मतदारसंघातील शिरूर (कासार) आणि बीड तालुक्यातील रेल्वे विषयी ग्रामस्थांच्या अनेक अडीअडचणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा.खा.शरदचंद्र पवार यांच्या समोर बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीमांडल्या.
पवार यांनी रेल्वे मंत्र्यांना तातडीने पत्र देऊन समस्यांचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे
.------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis