रत्नागिरी : एनसीसी कॅडेटसाठी 10 ते 19 नोव्हेंबर मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट शिबिर
रत्नागिरी, 14 ऑक्टोबर, (हिं. स.) : नेव्हल नॅशनल कॅडेट कोअर (NCC) कॅडेटसाठी 10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2025 या कालावधीत मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट (MENU-26) शिबिराचे आयोजन करण्यात येत असून हे शिबिर महाराष्ट्र संचलनालयाचे राष्ट्रीय स्तरावर प्
रत्नागिरी : एनसीसी कॅडेटसाठी 10 ते 19 नोव्हेंबर मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट शिबिर


रत्नागिरी, 14 ऑक्टोबर, (हिं. स.) : नेव्हल नॅशनल कॅडेट कोअर (NCC) कॅडेटसाठी 10 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2025 या कालावधीत मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट (MENU-26) शिबिराचे आयोजन करण्यात येत असून हे शिबिर महाराष्ट्र संचलनालयाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती लेफ्टनंट कमांडर रमनजुल दीक्षित यांनी दिली.

या शिबिरात 60 कॅडेट्स, 2 भारतीय नौदल अधिकारी, 9 नेव्ही सेलर स्टाफ, 3 ANO (2 महिला आणि 1 पुरुष) आणि 5 नागरी कर्मचारी यांचा सहभाग असेल. मेन्यू-26 हे एक चालते (मुव्हिंग) शिबिर आहे. या शिबिरातील कॅडेट्स रत्नागिरी ते विजयदुर्ग आणि परत या मार्गावर डीके व्हेलर बोटींनी (खेचत/रोईंग करत) विविध बंदरांवरून प्रवास करतील. एकूण तीन डीके व्हेलर बोटी असतील. त्या कॅडेट्स चालवतील. या बोटींना दोन भाड्याच्या बचाव बोटी (यांत्रिक) आणि एक सेफ्टी बोट (यांत्रिक) सहाय्य करणार आहेत. त्या संपूर्ण प्रवासात सोबत राहतील. सर्व बोटी एकत्र प्रवास करतील. प्रवासाचा मार्ग आणि कार्यक्रम असा - 10 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी ते रनपार, 11 नोव्हेंबर रोजी रनपार ते पूर्णगड, 12 नोव्हेंबर रोजी पूर्णगड ते जैतापूर, 13 नोव्हेंबर रोजी जैतापूर ते विजयदुर्ग, 14 नोव्हेंबर रोजी विजयदुर्ग ते देवगड, 15 नोव्हेंबर रोजी देवगड ते विजयदुर्ग, 16 नोव्हेंबर रोजी विजयदुर्ग ते जैतापूर, 17 नोव्हेंबर रोजी जैतापूर ते पूर्णगड, 18 नोव्हेंबर रोजी पूर्णगड ते रनपार, 19 नोव्हेंबर रोजी रनपार ते रत्नागिरी.

कॅम्पमध्ये सहभागी अधिकाऱ्यांचे संपर्कसाठी क्रमांक असे - कॅम्प कमांडंट - लेफ्टनंट कमांडर रमनजुल दीक्षित – ९७४६००८८११, उप कॅम्प कमांडंट - सी. मौर्य, पी.ओ. – ९६६९००६८१५, युनिट ई-मेल – klpur2navalratnagiri@gmail.com.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande