परभणी - मोटरसायकल चोर पोलिसांच्या जाळयात
परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।शहरातील नानलपेठ पोलिसात मोटरसायकल चोरी गेल्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात नानलपेठ आणि स्थानिक गुन्हा शाखेचा समांतर तपास सुरू होता. या प्रकरणी सोमवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आर
परभणी - मोटरसायकल चोर पोलिसांच्या जाळयात


परभणी, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।शहरातील नानलपेठ पोलिसात मोटरसायकल चोरी गेल्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात नानलपेठ आणि स्थानिक गुन्हा शाखेचा समांतर तपास सुरू होता. या प्रकरणी सोमवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी मोहन शामराव नवघरे (वय 19) रा.जिजामाता नगर परभणी यास गांधीपार्क परिसरात मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले.

आरोपीची चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्हयातील मोटरसायकल चोरीची कबुली दिली. या कारवाईत आरोपीकडून हिरोहोन्डा स्पेल्डर कंपनीची अंदाजे 40हजार रूपये किंमतीचे मोटरसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात आणि अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक विवेकानंद पाटील, सहायक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप, सहायक पोलिस उपनिरिक्षक चठ्ठे, केंद्रे, पोलिस अंमलदार निलेश भुजबळ, केशव लटपटे, रंजीत आगळे, सुर्यकांत फड, तुपसुंंदर, बुधवंत, शेख उमर, उत्तम हनवते आणि सायबर सेलचे गणेश कौटकर यांच्या पथकाने मिळून केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande