छत्रपती संभाजीनगर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन नोंदणी व अर्ज भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यात आली आहे. ही परीक्षा दि.२८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार, नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि.२१ ऑक्टोबर असून, विलंब शुल्कासह दि.२२ ते ३० ऑक्टोबर पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. मात्र अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची सुविधा लागू राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दि.३० ऑक्टोबर नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या आयुक्त श्रीमती अनुराधा ओक यांनी दिली आहे.
शिष्यवृत्ती अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in आणि https://mscenmms.in या संकेतस्थळांवर भरता येतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis