नांदेड - 17 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना सादर कराव्यात – जिल्हाधिकारी
नांदेड, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम क्र. 5) च्या तरतुदीनुसार नांदेड जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने, संबंधित क्षेत्रांतील नि
नांदेड - 17 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना सादर कराव्यात – जिल्हाधिकारी


नांदेड, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम क्र. 5) च्या तरतुदीनुसार नांदेड जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने, संबंधित क्षेत्रांतील निवडणूक विभाग व निर्वाचक गणांचे प्रारूप आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांचा क्रमांक २०२५/जिबी/डेस्क-/टे-२/जिपपंस/आरक्षण/सिआर-०३ दिनांक १४/१०/२०२५ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्रारूप आरक्षण अधिसूचनेची प्रत प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर, सर्व तहसिलदार, जिल्हा नांदेड यांचे कार्यालयातील फलकावर, सर्व पंचायत समिती, जिल्हा नांदेड यांचे कार्यालयातील फलकावर.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणांमध्ये एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच सर्वसाधारण स्त्रियासाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रियांसह) यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले विभाग यामध्ये नमूद आहेत.

या आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास, त्यासंबधीची जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना स्वरूपात 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर कराव्यात.

जिल्हा परिषद निवडणूक विभागासंबंधी हरकती / सूचना या प्राधिकृत अधिकारी तहसिलदार (सामान्य), जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांचेकडे सादर कराव्यात. पंचायत समिती निर्वाचक गणासंबंधी हरकती / सूचना संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांचेकडे सादर कराव्यात.

दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर प्राप्त होणाऱ्या हरकती / सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत असे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande