नाशिक - नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी हरकती नोंदवण्यात येणार
नाशिक, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) - राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकी संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने नवीन अधिसूचना प्रकाशित केले आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आहे काही कालावधीनंतर परत एकदा निवडणुकीचा बिगुल हा वाजणार आहे
नाशिक - नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी हरकती नोंदवण्यात येणार


नाशिक, 14 ऑक्टोबर, (हिं.स.) - राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकी संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाने नवीन अधिसूचना प्रकाशित केले आहे त्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आहे

काही कालावधीनंतर परत एकदा निवडणुकीचा बिगुल हा वाजणार आहे त्यामध्ये आता नगरपालिका नगरपंचायतीचे सुद्धा समावेश आहे रजमध्ये 287 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती ज्यांच्या निवडणुका होणार आहेत याबाबतचा आदेश निवडणूक विभागाचे सचिव सुरेश काकणी यांनी सोमवारी उशिरा प्रकाशित केला आहे त्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या प्रारुप मतदार यादी वरती हरकती आणि सूचना या 17 ऑक्टोंबर पासून सुरु होणार असून अंतिम प्रभाग निहाय यादी ही आता 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केली जाणार आहे तर मतदार यादी वरती हरकती या सात नोव्हेंबर पर्यंत घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोग हा आपला निर्णय देणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने केलेला बदल हा अप्रत्यक्षरीत्या असा संकेत देत आहे की येणाऱ्या काळात सगळ्यात पहिले महानगरपालिका आणि नंतर जिल्हा परिषद आणि शेवटी नगरपालिका नगरपंचायती निवडणुका लागू शकतात असे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत पण त्यामध्ये बदल होण्याचा दावा देखील केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande