पुण्याला एक हजार ई बस मिळणार
पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह’ योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच एक हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार या बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ‘रिझर्व्ह बँक
PMPML


पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह’ योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात लवकरच एक हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार या बस खरेदी करण्याचा प्रस्ताव ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ (आरबीआय) आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.‘अवजड उद्योग खात्याचे मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला,’ अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहरातील लोकसंख्यावाढ आणि शहरीकरणामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढला आहे. तसेच, वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यामुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात सुमारे दोन हजार बस आहेत. मात्र, शहराच्या भविष्यातील गरजेनुसार या बस कमी पडत असून, मेट्रोला पूरक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास चार हजार बसची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कुमारस्वामी यांनी प्रस्तावाला सकारात्मकता दर्शवली असून मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले.’

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande