डहाणूत राजकीय भूकंप : अनेक मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश
पालघर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)|डहाणूत आज मोठा राजकीय भूकंप झाला असून विविध पक्षांतील मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रसंगी डहाण
डहाणूत राजकीय भूकंप : अनेक मान्यवरांचा शिवसेनेत प्रवेश


पालघर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)|डहाणूत आज मोठा राजकीय भूकंप झाला असून विविध पक्षांतील मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या प्रसंगी डहाणूचे माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी, शिक्षणमहर्षी मिलिंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सईद शेख, भाजपाचे माजी शहराध्यक्ष मिलिंद माळवे, उभाठाच्या माजी नगरसेविका माधुरी धोडी, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खुताडे, भाजपाचे शहर उपाध्यक्ष वैभव मर्दे, उभाठाचे माजी उपशहरप्रमुख हसमुख धोडी, तसेच आसवे ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू गुरोडा आणि उपसरपंच पिंटू सावरा यांसह सर्व सदस्य, तसेच सावटा ग्रामपंचायत सदस्य हितेश माच्छी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे डहाणू तालुक्यात शिवसेना आणखी मजबूत झाली असून आगामी डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली आहे. नगरपरिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि बहुसंख्य नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, उपनेते निलेश सांबरे, उपनेत्या ज्योती मेहेर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षप्रवेशानंतर उपस्थित नेत्यांनी सांगितले की, डहाणू नगरपरिषदेसह परिसरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे पुढील काही दिवसांत डहाणूतील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande