पुण्यात परवानाधारक फटाका स्टॉल २४ तास खुले राहणार
पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)पुणे - शहरातील परवानाधारक फटाका विक्रेत्यांना यंदाच्या दिवाळीत २४ तास दुकाने आणि स्टॉल खुले ठेवण्यास पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणेकरांना कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहेत. राज्य
पुण्यात परवानाधारक फटाका स्टॉल २४ तास खुले राहणार


पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)पुणे - शहरातील परवानाधारक फटाका विक्रेत्यांना यंदाच्या दिवाळीत २४ तास दुकाने आणि स्टॉल खुले ठेवण्यास पोलिस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणेकरांना कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहेत.

राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या एक ऑक्टोबर २०२५ रोजीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी पुणे महापालिका, नगरपरिषदा, छावणी मंडळ तसेच ग्रामीण भागात तात्पुरत्या स्टॉलमार्फत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होते.या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व परिमंडळांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यांना आवश्यक सूचना कराव्यात. यामुळे परवानाधारक दुकानदारांना पोलिसांकडून अनावश्यक त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश पोलिस उपायुक्त (मुख्यालय) राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिले आहेत. या आदेशामुळे दिवाळीत रात्री उशिरापर्यंतही फटाके खरेदी करता येणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande