पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)मॅाडेल कॅालनी येथील रहिवासी, माजी महापौर बाळासाहेब शिरोळे-पाटील (वय ९२) यांचे मंगळवार सकाळी खाजगी दवाखान्यात निधन झाले.ते १९७४ व १९७९ मध्ये सलग दोन वेळा महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. प्रथम वाहन व्यवहार समितीचे अध्यक्ष नंतर १९८३-८४ मध्ये पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांनी कार्य केले.रोज सकाळी पायी चालण्याचा व्यायाम करण्याचा अनेक वर्षाचा परिपाठ होता. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी महापौर, आमदार भाऊसाहेब शिरोळे यांचे ते धाकटे बंधु होत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु