आ. संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये प्रश्नचिन्ह
बीड, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत
आमदार संग्राम जगताप यांच्या बीड मधील हिंदूजनआक्रोश मोर्चाच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह!


बीड, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. अजित पवार यांनी पक्षाच्या विचारसरणीवर भाष्य केले होते. सर्वसमावेशक अशी पक्षाची भूमिका मांडताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज-फुले-शाहू-आंबेडकर, याच्या विचारांवर काम करेल, असे अजित पवार यांनी म्हटले होते.

अजित पवार यांनी यापूर्वीही आमदार संग्राम जगताप यांना इशारे दिले होते तरीही त्यांच्यावर त्यांनी आपली भूमिका बदलली नाही म्हणून त्यांना कारणं दाखवा नोटीस देण्याचे संकेत पक्षाकडून दिले गेले असून, आमदार संग्राम जगताप यांचे इतर दौरे सोडून आजच आमदार संग्राम जगताप यांना मुंबईत तातडीने बोलावलं आहे. अजित पवार आणि जगताप यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande