पुणे, 14 ऑक्टोबर, (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मागील सहा महिन्यांत दोन लाख २७ हजार ८९५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून १२.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २.३५ कोटींचा दंड सप्टेंबर महिन्यात वसूल झाला आहे. दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
दिवाळीनिमित्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्याने प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. या काळात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे. पुणे विभागाने पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा आणि अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु