रत्नागिरी, 14 ऑक्टोबर, (हिं. स.) :सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण ७२ पदांकरिता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्र उमेदवारांना वेब बेस्ड (Web-based) ऑनलाइन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 5 नोव्हेंबर रात्री 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
भरती केल्या जाणार असलेल्या 72 पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातील किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता/उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएस आयओएन यांच्यामार्फत होणार असून परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब बेस्ड (Web-based) ऑनलाइन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (Resources Tab --> Recruitment Tab येथे दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रौ 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर वेबलिक बंद होईल. या भरतीचा जिल्ह्यात्तील माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी