छ. संभाजीनगर - भाजपाचे पक्ष संघटन वाढवण्याचा मंत्री गोरे यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन रा
अ


छत्रपती संभाजीनगर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी धाराशिव येथे केले.

प्रतिष्ठान भवन, भाजप कार्यालय धाराशिव येथे भारतीय जनता पक्ष धाराशिवतर्फे आयोजित पदाधिकारी संवाद मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री.श्री. जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला.

या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढवण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सविस्तरट मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

यावेळी माजी आमदार श्री.सुजितसिंह ठाकूर, श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.सुरेशभाऊ देशमुख, श्री.नितीन काळे, श्री.संताजी चालुक्य, श्री.सतीश दंडनाईक, श्री.नेताजी पाटील, श्री.नितीन भोसले, श्री.खंडेराव चौरे, श्री.साहेबराव घुगे, श्री.विनोद गपाट यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चा व आघाडीचे जिल्हा पदाधिकारी, ग्रामीण व शहर मंडळ अध्यक्ष, विविध अभियानाचे जिल्हा संयोजक आणि प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande