पुणे - शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचे अर्ज संकेतस्थळावर भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षेच
पुणे - शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ


पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेचे अर्ज संकेतस्थळावर भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षेचे शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज http://www.mscepune.in व http://mscenmms.in या संकेतस्थळावर नियमित शुल्कासह २१ ऑक्टोबरपर्यंत व विलंब शुल्कासह २२ ते ३० ऑक्टोबर पर्यंत सादर करता येतील. अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार नाहीत. ३० ऑक्टोबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande