लातूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।
मुंबई, ठाणे व पुण्यात तिन्ही अपहृत मुलींचा शोध;
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) लातूर पथकाची उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई, ठाणे व पुणे शहरातून तिन्ही अपहृत अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.
या प्रकरणांमध्ये गांधी चौक, एमआयडीसी व औराद शहाजानी पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद होती. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सर्व प्रकरणांचा आढावा घेत AHTU टीमला समांतर तपासाचे आदेश दिले होते. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद तिडेके व त्यांच्या पथकाने ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान मुंबई, ठाणे व पुणे येथे सखोल तपास करून या तिन्ही मुली आणि संबंधित आरोपींना शोधून काढले.
गांधी चौकातील मुलगी भिवंडी (जि. ठाणे) येथे, औराद शहाजानीतील पिडीत व आरोपी कांदिवली (मुंबई) येथे तर एमआयडीसी प्रकरणातील मुलगी व आरोपी फर्गुसन कॉलेजजवळ, पुणे येथे मिळाले. सर्वांना संबंधित पोलीस ठाण्यांत हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis