पुणे : सांडपाणी शुद्धीकरण केंद्रास प. आफ्रिकी देशांतील शिष्टमंडळाची भेट
पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट (जीजीजीआय) यांच्या “पश्चिम आफ्रिका सिटीवाइड इन्क्लुझिव्ह सॅनिटेशन” प्रकल्पांतर्गत आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन तसेच सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या
sast mandal


पुणे, 14 ऑक्टोबर (हिं.स.)ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट (जीजीजीआय) यांच्या “पश्चिम आफ्रिका सिटीवाइड इन्क्लुझिव्ह सॅनिटेशन” प्रकल्पांतर्गत आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन तसेच सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने ज्ञानविनिमय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल, बुर्किना फासो आणि कोट द आयव्हरी या देशांतील शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केंद्र (वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प) तसेच कॉम्बीट्रीट सांडपाणी शुद्धीकरण केंद्राला भेट दिली.

जीजीजीआय सध्या सेनेगल,बुर्किना फासो आणि कोट द आयव्हरी या देशांमध्ये“हवामान सक्षमता द्वारे सर्वसमावेशक शहरी स्वच्छता प्रोत्साहन”हा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत महापालिकेच्या यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करून,स्थानिक प्रशासनांमध्ये त्या अनुभवांचा उपयोग करण्याचा हेतू या भेटीमागे होता. महापालिकेचे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केंद्र आणि कॉम्बीट्रीट सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प हे देशभरातील आदर्श आणि शाश्वत उपाययोजनांचे उत्कृष्ट उदाहरण मानले जातात.

या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व मन्सूर फॉल (गेट्स फाउंडेशनचे सल्लागार) यांनी केले. त्यांच्या सोबत जेरोम फाख्री (प्रादेशिक तांत्रिक प्रमुख–सर्क्युलर इकॉनॉमी,जीजीजीआय,आफ्रिका विभाग),सिदी का (प्रमुख–तांत्रिक अभ्यास कार्यालय,स्वच्छता संचालनालय,सेनेगल),ज्युलिएन तिअंद्रेबेओगो (महासंचालक–स्वच्छता विभाग,पर्यावरण मंत्रालय,बुर्किना फासो),उस्सेनी ओउएद्राओगो (संचालक–क्षेत्रीय आकडेवारी विभाग,पर्यावरण मंत्रालय,बुर्किना फासो),अद्जुआ हेलेन ब्रागोरी एप्से योकोली (संचालक–शहरी स्वच्छता आणि निचरा विभाग,जलसंपदा मंत्रालय,कोट द आयव्हरी),डायनाबा फाये (प्रमुख–गुणवत्ता,सुरक्षा आणि पर्यावरण विभाग,राष्ट्रीय स्वच्छता कार्यालय,सेनेगल) तसेच मेरी क्रिस्टिन एमी सेंट फाये (सहयोगी–स्वच्छता विभाग,जीजीजीआय) उपस्थित होत्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली चालू असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन,ऊर्जा निर्मिती प्रक्रिया,सांडपाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आणि पुनर्वापर उपक्रमांबाबत तसेच मोशी येथील घनकचरा स्थानांतरण केंद्र,प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्प,बांधकाम राडारोडा गोळा करून प्रक्रिया करण्याचा प्रकल्प (सी अँड डी वेस्ट प्लांट),बायो मेडिकल वेस्ट प्लांट,मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी,हॉटेल वेस्ट-टू-बायोगॅस प्रकल्प,बायो मायनिंग प्रकल्प,मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्प आणि इतर पर्यावरणपूरक प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande