सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभाचा सोहळा
सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभाचा सोहळा बुधवारी मुंबई विमानतळावर होणार आहे. शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला येणार आहेत. मुंबईहून येणारे विमान सलग दोन्ह
Airport Solapur Today


सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभाचा सोहळा बुधवारी मुंबई विमानतळावर होणार आहे. शुभारंभानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरला येणार आहेत. मुंबईहून येणारे विमान सलग दोन्ही दिवस फुल्ल असून पहिल्याच दिवशी प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

विमानसेवेच्या स्वागताची तयारीही विमानतळावर पूर्ण केली आहे. मुंबई विमानतळावरील कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत. बुधवारी दुपारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून पहिली फ्लाईट सोलापूर विमानतळावर येणार आहे. यावेळी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रवासी विमानतळावर दाखल झाल्यानंतर कंपनीकडून सर्वच प्रवाशांचे स्वागत करण्यात येणार आहे. विमानाच्या स्वागताला नाशिक ढोल पथक असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande