सोलापूर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। सोरेगाव व पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा नऊ तास खंडित राहिल्याने पाणी उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा एक रोटेशनसाठी एक दिवसाने पुढे जाणार आहे. पुढील आठवड्याभरासाठी विस्कळित राहणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पाणीपुरवठ्याचे नियोजन बिघडणार आहे.
शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाकडून होणारा विद्युत पुरवठा पहाटे ५: ३० ते दुपारी १: १५ पर्यंत खंडित झाला होता. तर पाकणी जलशुद्धीकरण केंद्रास होणारा विद्युत पुरवठा दुपारी १२ ते रात्री ९. ३० वाजेपर्यंत खंडित झाला होता. यामुळे टाकळी पंप हाऊसवरून आठ तास पाणी उपसा बंद राहिला.उजनी पंप हाऊसवरून सुमारे नऊ तास पाण्याचा उपसा होऊ शकला नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक रोटेशन म्हणजेच एक दिवसाने पुढे जाणार आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पुढील आठवडाभर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित राहणार आहे. योग्य त्या उपाययोजना करून ऐन दिवाळीत पाण्याची चांगली सोय करावी अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड