बीड, 14 ऑक्टोबर (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड (उमरेपाटील) यांनी सुरू केलेल्या उपोषणाला मंगळवारी चार दिवस उलटला, तरी प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी केजमध्ये रास्तारोको आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनाने तब्बल साडेचार तास वाहतूक ठप्प केली, मात्र यावेळी झालेल्या हिंसक घटनांनी या रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर थांबलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेस फोडल्या. यात वाहक बालाजी मुंडे यांच्यासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. दगडफेकीमुळे एकूण ३० बसेस पोलीस बंदोबस्तात केज बस स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या हिंसक घटनेमुळे या आंदोलनाचे गांभीर्य अधिक वाढले या रास्ता रोकोमुळे केजच्या चारही दिशांनी (बीड, धारूर, कळंब, अंबाजोगाई) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रशासनातील अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis